पी. ओ. पी. मूर्ती बंदी बाबत मुर्तीकारांना तत्काळ नोटीस देण्यात यावी
●मूर्तिकार संघटनेची मागणी..
वणी (13 एप्रिल) :- पी.ओ.पी.मुर्ती उत्पादन, विक्री व साठवूनीकीवर बंदी घालुन तात्काळ नोटीस बजावण्यात यावी या करीता वणी मुर्तीकार संघटनेच्या वतीने १३ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

वणी शहर व परिसरातील मूर्तिकार प्रामुख्याने मातीच्या मूर्ती घडविणारे आहेत. त्यासोबतच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या दिशा निर्देशका नुसार पी. ओ. पी. मूर्ती उत्पादन विक्री आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आली असून या संदर्भात सर्व कारवाई करण्याचे हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. पण ही कारवाई फक्त नावापुरतीच केली जाते असे स्थानिक मूर्तीकारांचे म्हणणे आहे. या वर्षी मूर्तिकार मूर्ती बनविण्याच्या कामाला लागण्या पूर्वीच त्यांना पी. ओ. पी. मूर्ती बंदी बाबत नोटीस देण्यात यावी अशी मागणी वणी मूर्तिकार संघटनेद्वारे निवेदन सादर करून जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
यावेळी अध्यक्ष सुधाकर बुरडकर , उपाध्यक्ष नत्थु डुकरे , रवींद्र पाटाळकर , सुहास झिलपे , कमलाकर झिलपे , गंगाधर खंडारे , प्रभू मत्ते , मनीष बुरडकर आदी उपस्थित होते.






