Vidarbh24News

Latest Online Breaking News

28 वर्षीय महिलेचा मृतदेह बेडवर संशयास्पद आढळला….

●गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आली समोर

●अद्यापही कारण गुलदस्त्यात,शवविच्छेदनात येणार खर कारण समोर ?

वणी (11 एप्रिल ):- तालुक्यातील राजूर या गावात सकाळी 6.30 वाजताचा सुमारास 28 वर्षीय महिलेचा मृतदेह बेडवर संशयास्पद आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. सविस्तर वृत्त असे की,संगीता उर्फ राणी राकेश केवट वय २८ वर्ष. हि घरामध्ये मृतावस्थेत प्रथम दर्शी तिचा पतीलाच ( राकेश केवटला वय 32 वर्ष ) याला आढळून आला व त्याने आरडा ओरड करताच सर्वांना लक्षात आले. त्यामुळे गावातील पोलिस पाटील यांनी सकाळचा 8 वाजताच सुमारास वणी पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यावेळी वणी ठाणेदार रामकृष्ण महल्ले व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार ,राजूर बिटचे पीएसआय शिवाजी टिपूर्णे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत मृतक महिलेचे शव वणी  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास दाखल करण्यात आले.पोलिसांचा प्राथमिक दिलेल्या माहितीनुसार तिने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले परंतु खर काय आहे  ? हे शवविच्छेदना नंतर स्पष्ट होईलच अशी माहिती देखील राजूर बिटचे पिएसआय शिवाजी टिपूर्णे यांनी दिली आहे.परंतु राणी केवट हीचा  मृत्यू संशयास्पद शेजाऱ्यांना दिसत असल्याने गावातील लोकांमध्ये तर्क वितर्क लावणे सुरू होती.पुढील पोलिस व त्यांची टीम करीत आहे .राणीचा मृत्यू हत्या की आत्महत्या ? हे शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळू शकले.तिचा पाठीमागे दोन मुली असा आप्त परिवार आहे. तीचा मृत्यूने मुलं पोरकी झाली आहे हे एक भावुक दुःखच ..

दो

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!