वैद्यकीय शिक्षणात ओबीसी विद्यार्थांवरील अन्याय दूर करावं
वैद्यकीय शिक्षणात ओबीसी विद्यार्थांवरील अन्याय दूर करावं
मराठा सेवा संघाचे प्रशासनाला निवेदन
महेश काहीलकर/विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर-ओबीसी वैद्यकीय शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्यात यावे व वैद्यकीय क्षेत्रातील ओबीसी विद्यार्थावरील अन्याय दूर करावा , अशी मागणी मराठा सेवा संघाने केली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.सद्या वैद्यकीय शिक्षणात पदवित्तर अभ्यास कर्मासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या यादीतील चित्र बघता ओबीसी हक्काचे २७ टक्के आरक्षण दिल्या जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यावरील अन्याय त्वरित दूर करावा , अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी मराठी सेवा संघ ,चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष सतीश मालेकर, जिल्हासचिव प्रा. अनिल डाहाके, वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद, चंद्रपूरचे जिल्हाअध्यक्ष मयूर पाऊनकर आदी उपस्थित होते.


