Vidarbh24News

Latest Online Breaking News

आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण बाधीत संख्या 26

जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण बाधीत संख्या 26

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Ø  जिल्ह्यात 74 हजारांवर नागरिक दाखल

Ø  ॲक्टीव्ह बाधीतांची संख्या 4

Ø  आतापर्यंत 22 बाधीत कोरोनातून बरे

Ø  एक हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात

Ø  67 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण

Ø  नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा

चंद्रपूर,दि.4 जून: सकाळी हरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील 30 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता व हैद्राबाद येथून आलेल्या भद्रावती येथील 49 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 26 झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत 22 रुग्ण कोरोना मुक्त झाले.त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या दोन रुग्ण कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले असून मुल व भद्रावती येथील एकुण 2 पॉझिटिव्ह रुग्णाला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 4 असून या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक  व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.जिल्ह्यात एकूण 14 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तीन कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले असून 11 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.

14 कंटेनमेंट झोन मधील आयएलआय व सारी रुग्णांचे आजपर्यंत 42 स्वॅब नमुने घेण्यात आले असून एकूण 39 निगेटिव्ह व तीन प्रतीक्षेत आहेत.

सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे व आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 25 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-5, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

जिल्ह्यामध्ये 1 हजार 235 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 26 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 27 नमुने निगेटिव्ह तर 182 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 4 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 799 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 1 हजार 106 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 403 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तर, जिल्हास्तरावर 290 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 74 हजार 477 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 67 हजार 264 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 7 हजार 213 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण बाधीत 2 ), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ) 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत 26 झाले आहेत.आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 26 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 4 आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!