Vidarbh24News

Latest Online Breaking News

*वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील व्यक्ती ठार*

*वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील व्यक्ती ठार*
*चिंतलधाबा बिट कक्ष क्र.96 मध्ये घटना*

पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील पुरुषोत्तम मडावी ( 52 वर्ष ) दि. 04/03/2021 ला पोंभूर्णा ते आक्सापूर मार्गावर चेक आष्टा फाट्याजवळ तलावात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले होते,त्यांच्या सोबत आणखी ३ व्यक्ती होते, संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता पुरूषोत्तम मडावी अचानक गायब झाला.
सदर व्यक्ती रात्रौ पर्यंत घरी न आल्याने रिस्तेदार व गावातील नागरिकांनी रात्रौ 8 ते 9 वाजताच्या सुमारास आजूबाजूच्या परिसरात व जंगलात शोधाशोध केली असता, सदर व्यक्ती मिळाला नाही.

आज दि. 05/03/2021 ला सकाळी गावातील व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता, चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. 96 राखीव जंगलात वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम मडावी यांचे मुत्यू झाल्याचे आढळून आले.
घटनास्थळी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी गाेंडपिपरी ला पाठविण्यात आले.
त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, Acf कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर जी मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते.
मृतकाच्या परीवाराला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मृतकाच्या एका वारसांना नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!