Vidarbh24News

Latest Online Breaking News

नियम धाब्यावर ठेऊन, नांदेपेरा चौफुलीवर दारुड्यांचा गराडा

सामान्य जनतेसोबत घडत असतात मारहाणीचे प्रकार, पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

वणी( 2.मार्च) :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. साय.५ वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहे. तरीही शेटर बंद करुन तड़ीराम आपली सोय करुन घेत असल्याची चर्चा शहरात आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष करण्याची गरज आहे.तड़ीराम बिनधास्तपणे ह्याभागात वावरत असतात. त्यामुळे तळीरामांना शहरानजिकच्या ले-आऊट, नांदेपेरा चौफुली तसेच वसाहतीलगत गुत्ता घालुन ,मैफील रंगवितांना बघायला मिळत आहे. 

त्यामुळे सायंकाळच्या वेळेस फिरायला निघालेल्या, महिलांवर हे तळीराम अभद्र प्रकारची टिका करतांना मागील काही दिवसापासुन आढळून येत आहे. तसेच यांच्या सोबत कुठल्याही प्रकारचा वाद घालतात.असे कित्येक उदाहरणे नांदेपेरा चौफुलीवर बघायला मिळत आहे. त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्यामुळे चौका- चौकात गुत्ता घालुन बसलेले टवाळखोर मुले यांच्यावर कोरोना नियमाचा कोणताही प्रकारचा प्रभाव नसल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे या गंभीर बाबी कडे पोलिस प्रशासनाने जाणिवपूर्वक लक्ष देऊन, एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी नांदेपेरा चौफुलीवर लक्ष देण्याची गरज असल्याची जनते मधुन बोलले जात आहे.

याबाबत विचारणा केली असता ,”पोलिस प्रशासनाच्या वतीने काल सायंकाळच्या दरम्यान शहरातील तसेच शहरालगत असलेल्या चौका-चौकात , समुह करुन बसत असलेल्या लोकांवर विविध कल्मान्वये कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या  कोरोना नियमावलीचा कुठल्याही प्रकारचा भंग करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरातील मुख्य चौक तसेच नांदेपेरा चौफुली ,शहरालगत असलेल्या ले- आऊट परिसरात साय.५ वाजायच्या नंतर कोणीही समुहामध्ये  आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे..”

—- पोलिस निरीक्षक वैभव जाधव

 

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!