Vidarbh24News

Latest Online Breaking News

15 वर्षीय युवकावर फाइटरने व लाथाबुक्क्यांनी 4 जणानी केला प्राणघातक हल्ला

वणी :- शहरातील टिळक चौक परिसरात 23 जानेवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास अनिमेश या तरुणावर 4 जणांनी हल्ला केला. या हल्यात अनिमेश दीपक गढवाल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

अनिमेश दिपक गढवाल (१५)रा.साई मंदिरामागे वणी असे जखमी युवकाचे नाव आहे. अमिनेश दि.२१ जानेवारीला टिळक चौकात आपल्या मित्रांसोबत असतांना आरोपी अनुर्वेश उर्फ चिकु अनिल सातपुते याच्या सोबत काही कारणावरून वाद झाला व वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. परिणामी प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. परंतु त्यावेळी सदर प्रकरण आपसी मिटवण्यात आले होते.

दरम्यान शनिवारी दि.२३ जानेवारीला त्याच ठिकाणी म्हणजे टिळक चौकात रात्री ९:३० वाजताचे सुमारास जखमी अनिमेश दिपक गढवाल हा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना आरोपी अनुर्वेश उर्फ चिकु अनिल सातपुते (२१)रा.छोरिया लेआऊट, अभिषेक विनोद ताराचंद (२०)रा.सेवानगर,ललीत सुभाष परचाके (२१)रा.रंगारीपुरा,रितीक नरेश चवरे (२०)रा.सेवानगर वणी हे चारही आरोपी टिळक चौकातील चाय कैंटीन जवळ असलेल्या अनिमेश जवळ आले व अनिमेश ला दुचाकीवर बसवुन नेण्याचा प्रयत्न करु लागले,

परंतु अनिमेश ने दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने त्याच्यावर फायटर व लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवून जखमी करुन फरार झाले. विशेष म्हणजे यावेळी अनिमेश चे मित्र तेथेच होते. या घटनेनंतर जखमी अनिमेशला त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी नेले. त्यानंतर अनिमेश च्या घरच्या मंडळींनी जखमी अनिमेश ला घेऊन पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली.या तक्रारी वरुन सदर आरोपी विरुद्ध कलम ३२४,५०४,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिन आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. त्या फरार आरोपीच्या शोधात पोलिस असुन पुढिल तपासात जमादार बोरनारे करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!