जिल्ह्यातील व तालुक्यातील तरूण पिढी बर्बाद होण्याचे मार्गावर
एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. पण आजपर्यन्त त्यावर खरी अंमलबजावणी झाली नसल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील तरूण वर्ग भरकटला जाऊन, रोजगाराअभावी तो दारूचे व्यवसायाकडे वळला व आपले जिवन बर्बादिकडे घेऊन गेला.
नोकरी किंवा कोणताही रोजगार नसल्याने त्याने दारू विकण्याचा मार्ग पत्करला. आणि व्यसनाधीन होऊन अवैध्य व्यवसायात गुंतला गेला. कारण दारूचे व्यवसायात दिवसाला डबल कमाई होत असल्याने, आपले भविष्यच बर्बाद करूण बसला. कांही शिकलेले विद्यार्थी अनेक नशिल्या शौकाचे आधीन होऊन गांजा सारख्या नशिल्या वस्तुचे आधिन झाले असल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकले आहे. कारण दारू प्राशन करून, वाहन चालवितांना झालेल्या अपघातात अनेकांना जिव गमवावे लागले असुन, कांही गंभीर जखमी झाल्याने अपंग होऊन बसलेत. याला शासन आणि प्रशासन दोन्हीही जबाबदार असल्याचे मत व्यक्त करीत, शासनाने जिल्हा दारूबंदी केली तर त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहीजे होती. ती न झाल्याने अवैध दारूविक्रीला चालना मिळाली. परिणामी सुशिक्षीत तरूण मंडळी झटपट कमाईचे दृष्टीने तिकडे आकर्षीत झाली. याला जबाबदार राज्य सरकार तसेच चंद्रपूर जिल्हा प्रशासन व स्थानिक सिंदेवाही तालुका प्रशासन असल्याचे मत मनोहरराव पवार यांनी व्यक्त केले.