Vidarbh24News

Latest Online Breaking News

उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये १९ वर्षीय दलित युवती वर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला त्या दोषींवर कडक कारवाही व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला रा.काँ.पा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांना पाठवले पत्र..

आशिष यमनुरवार विदर्भ 24 डिजिटल न्युज राजुरा शहर /तालुका प्रतिनिधी 8855994001

उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये १९ वर्षीय दलित युवती वर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला त्या दोषींवर कडक कारवाही व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला रा.काँ.पा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांना पाठवले पत्र.

⏰ *चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांना पाठवले पत्र…
उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबाबत दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी * राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी साहेब, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब यांना पत्र पाठविण्यात आले
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाजपचे सरकार आहे. दिनांक १४ सप्टेंबर रोजी *उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये १९ वर्षीय दलित युवती वर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला.* यानंतर पिडीतेला दिल्लीच्या सफदरगंज रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १६ दिवसानंतर तिला मृत्युला सामोरे जावे लागले हे नक्कीच संतापजनक आहे. आपण देशात ज्या प्रमाणे जाहिरात बाजी करता त्यापेक्षा उलटच उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतो या कारणाने महिला, युवती, सर्व सामान्य जनता सुरक्षित नाहीत असे आमचे म्हणणे आहे.
*आपण देशात रामराज्य आणू अशी स्वप्ने जनतेला दाखवता मात्र आपल्या काळात गुंडाराज्य फोफावत चालला. उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारण्या पेक्षा कायदा सुव्यवस्था, सक्षम पोलिस यंत्रणा उभी करा जेणेकरून महिलांना राज्यात अत्याचाराला बळी पडावे लागणार नाही.* आपण कंगणा सारख्या अभिनेत्री ला सुरक्षा देता मात्र महिला, युवती सुरक्षे वाचून वंचित आहे. काल च्या घटनेत बलात्कारीत पिडीतेचा मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन न करता पोलिस यंत्रणे मार्फत अंत्यविधी केली जाते हे देखील भयावह आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाला असे आदेश कोणी दिले याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच या हत्याकांडामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींचा जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस वतीने मागणी करण्यात आली
*पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रपेटीत पत्र पाठवितांना उपस्थित राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्याजिल्हाध्यक्ष बेबीताई उईके माधुरी पांडे सुमित्रा वैध नीता पीपलसेडे शीतल लोखंडे आदि महिला उपस्थित होत्या.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!