Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर येथे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला गावात उत्स्फूर्त प्रतिसाद

राजुर येथील ग्रामपंचायतेत कर्तव्यदक्ष  नवनियुक्त प्रशासक म्हणून राजू निरवे यांचे गावकरयांनकडून ,” माझे कुटुंब …….माझी जबाबदारी” या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

वणी – तालुक्यातील राजुर गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला राजुर कॉलरीत खुप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. स्वयंसेविका म्हणून गावातीलच महिला वर्ग यांच्यातर्फे प्रत्येक राजुर येथील नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करून ,त्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत आहे.त्यात राजुर येथे 6 पथक तयार करण्यात आले आहे.त्यात प्रत्येकी 2-2 गट तयार करण्यात आले आहे. महिला स्वयंसेविका तपासणी व मार्गदर्शन करत आहेत.
दिवसेंदिवस कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरत आहे त्यावर मात करण्यासाठी वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करावा ताप, सर्दी, खोकला, शरीरात अशक्तपणा जाणवणे, ऑक्सिजन कमी असणे अशी लक्षणे आढळल्यास “माझं कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेतील व्यक्तींना माहिती देऊन त्वरित टेस्ट करून घ्यावी. जितक्या लवकर टेस्ट केली जाईल व तितक्या लवकर योग्य औषधोपचार आणि विलगिकरण करून प्रसार रोखता येतो. याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजुर ग्रामपंचायत येथील नवीन रुजू झालेले प्रशासक राजू निरवे यांनी केले आहे.” माझे कुटुंब …माझी जबाबदारी”

महेश्वरी राजू निरडावार,
पौर्णिमा संजय राजनलवार,
मनीषा नर्सय्या जेडावार,
अश्विनी अशोक राजनलवार,
दुर्गा विनोद येलगुलवार व
अमृता रमेश शिरपूरकर या स्वयंसेविका खुप परिश्रम घेत आहेत.तसेच ह्या स्वयंसेविकेच्या कार्याला गावकरयांकडून कौतुकाचा वर्षाव सुद्धा होताना दिसत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!