शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या
शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्या
नितीन गोहणे यांची मागणी
सावली :
मागील वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्याचे हातात आलेले धान पीक नष्ट झाले होते, वनविभाग सावलीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे पंचनामे केले होते. शासन स्तरावर शेतकरायचे पैसे मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाकडून एक वर्षाचा कालावधी लोटून जात असतांना सुद्धा शेतकऱ्याच्या बचत खात्यात रक्कम वडती करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित होता. सदर बाब सावली तालुका काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन गोहणे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी याबाबतचे निवेदन माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्याकडे निवेदनद्वारे लक्ष्यात आणून दिली.
माननीय नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी त्वरीत मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आणि मागील ऑक्टोबर 2019 मध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे धानशेतीचे झालेले नुकसानीचे पैसे त्वरीत शेतकऱ्याचे खात्यात जमा करणेबाबत निर्देश दिले.
विशेष म्हणजे शासनस्तरावर पैसे मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वडती करण्यात आली नव्हती. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात आता लवकरच रक्कम वडती होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे



