Vidarbh24News

Latest Online Breaking News

*शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा : आमदार प्रतिभाताई धानोरकर*

*शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा : आमदार प्रतिभाताई धानोरकर*

चंद्रपूर :  वरोरा – भद्रावती मतदार संघात मुख्य व्यवसाय हा शेती आहे. दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत असल्याच्या घटना देखील घडत असतात. परंतु शासनाच्या योजना असून देखील आपल्या भागातील शेतकरी बाकी जिल्ह्याच्या तुलनेत योजनांचा लाभ घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता शेतकऱ्याने पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे. यावेळी विभागीय कृषी सह संचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान किसान योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दर वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. परंतु बँक खाते, आधार कार्ड, आय. एफ. सी. क्रमांक यासारख्या कागदपत्राच्या उणिवांमुळे शेतकरी वंचित राहत असतो. तालुका कृषी अधिकारी, तलाठी व इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोहीम आखून  या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.

शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु त्या योजना शेतकऱ्यांना माहित नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती होण्याकरिता शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!