Vidarbh24News

Latest Online Breaking News

शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात 25 जुलै ला ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन.

आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज  राजूरा शहर/तालुका प्रतिनिधी 8855994001.

शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात 25 जुलै ला ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन.
गडचांदूर:येथील शरदराव पवार महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल ;राज्यशास्त्र आणि इतिहास विभागाच्यावतीने लैंगिक समानता आणि महिलांचे अधिकार या महत्वपूर्ण विषयावर 25 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार चेआयोजन करण्यात आलेले आहे. स्त्री आणि पुरुष ही समाजाच्या विकास रथाची दोन चाके असून स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार आणि हक्क मिळालाच पाहिजे या उदात्त हेतूने या ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनरचेआयोजन करण्यात आलेले आहे.या राष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आनंदरावजी अडबाले हे असतील तर या राष्ट्रीय वेबिनरचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांच्या हस्ते होत आहे. या राष्ट्रीय वेबिनार मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.संदीप तुडूंरवार राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री बिंझाणी नगर महाविद्यालय नागपूर आणि डॉ. संदीप काळे विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय सेलू-वर्धा या दोन अभ्यासू व प्रसिद्ध तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व प्राध्यापक वृंद; संशोधक; विद्यार्थी मित्रांनी या राष्ट्रीय वेबिनार मध्ये HTTPS://forms.gle/JCh4PrfwgiRP7poy7 या लिंक वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे अशी असे आवाहन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय गोरे आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ.शरद बेलोरकर यांनी केलेले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!