Vidarbh24News

Latest Online Breaking News

अतिक्रमण शेतजमिनीच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

अतिक्रमण शेतजमिनीच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

आरोपीला अटक करण्याची सिंदोळा वासीयांची मागणी

सिंदोळा –  शासनाच्या अनेक जमीनी या पडीत, ओसाड आहेत तर काही जमीनी जनावरांना चरण्यासाठी कुराण म्हणून ठेवण्यात आल्या , सावली तालुक्यातील साजा जिबगाव अंतर्गत येणाऱ्या सिंदोळा या गावातील जमीन ही सुद्धा कुराणासाठी सरकारने दिली होती ,पण गावातील काही लोक अतिक्रमण केले त्यांना ग्रामपंचायत सदस्य बंडू उंदीरवाडे यांनी विरोध केला असता , त्यांना मारहाण करण्यात आली.
सविस्तर असे की शासनाच्या अनेक जागा तालुक्यात पडीत, ओसाड आहेत , काही जागेवर जनावरांना कुराणासाठी देण्यात आल्या, सावली तालुक्यातील साजा जिबगाव अंतर्गत येणाऱ्या सिंदोळा येथील अशाच कुराणासाठी  रोड टच क्रमांक १०७ कुराण सरकाराची ४हेक्टर ६५ आर , जागा आहे अमित घोगरे नामक व्यक्तीने अतिक्रमण केले आहे , सोबतच १०८ क्रमांकात ०.४५ आर ऐवढी कुराण जागा आहे यावर अमीत घोगरे ,गुरुदास उंदीरवाडे या व्यक्तीचे अतिक्रमण, तसेच रस्त्याच्या दुसरी बाजू २ हेक्टर ४३ आर  आहे, गेली १० ते १५  वर्षांपासून या जागेवर वरील व्यक्तीनी अतिक्रमण करून ठेवले आहे
सिंदोळा या गावातील ग्रामपंचायत सदस्य बंडु उंदीरवाडे हे  वनसमीतीचे अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण गाव या समितीत आहे , गावच्या दृष्टीने व जनावरांच्या दृष्टीने संबंधित जागा ही कुराणच असावी अशी त्यांची आर्त मागणी आहे परंतु गेली १० ते १५ वर्ष अमीत घोगरे, गुरुदास उंदीरवाडे व्यक्तीनी अतिक्रमण करून ठेवले आहे हा अशाच संघर्ष असताना तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले  शेवटी शासनाने मागील वर्षी त्यांचे अतिक्रमण काढले.
 या वर्षी एक दोन महिन्यांपूर्वी पुन्हा तिथेच आणि त्याच व्यक्तीनी अतिक्रमण केले याची माहिती व तक्रार घेऊन बंडू उंदीरवाडे सावली तहसीलदार यांना दिले , घटनेच्या दिवशी ते तक्रार देऊन येत असताना सिंदोळा नाल्यावर .३० च्या दरम्यान अतिक्रमण धारकांनी त्याना बेदम मारहाण केली.
सावली पोलिस मौकाचौकशी करण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी त्यांना घेराव करुन आरोपींना तात्काळ अटक करा अशी एकमुखी मागणी केली, आरोपी विरुद्ध कलम ३२४,३४ भांदवी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, तर अतिक्रमण धारक अमीद घोगरे यांनीही मला धारदार वस्तूने मला मारहाण केली त्याला ही आठ टाके बसले त्यांनीही तत्क्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार बंडू तोडसे करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!