Vidarbh24News

Latest Online Breaking News

चकपिरंजी येथे हनुमान जयंती निमित्त महाआरती सोहळा*

*सावली* हनुमान जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील चकपिरंजी येथील रामभक्त पवनपुत्र श्री हनुमान जन्मोत्सव समीती चकपिरंजीच्या वतीने मंदिरात भव्य महाआरती व हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, साथ फाउंडेशनचे अध्यक्ष भाजप नेते रोहित बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष,मुना स्वामी, अर्जुन भोयर, निखिल सुरमवार,लोकनाथ रायपुरे, अभय गावळे, लक्ष्मण मंडरे,मुरलीधर येडमे,प्रभाकर चौधरी, जगनन्नाथ चिमुरकर, अमृत चौधरी, प्रकाश वरगंटीवार,भोगेश्वर मोहर्ले,ईश्वर बट्टे,आदी मान्यवर, गावकरी व हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना रोहित बोम्मावार यांनी हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून आपल्याला कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळते.असे मत व्यक्त केले.तसेच धार्मिक कार्यक्रम हे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता समाजातील एकात्मता आणि सद्भावना वाढविण्याचे कार्य करतात, असेही बोम्मावार म्हणाले.

भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने महाआरतीत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आयोजन, स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!