Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली वनपरिक्षेत्रात जागतिक वनदिन उत्साहात साजरा*

“*जंगल वाचविणे व निसर्गाचे संरक्षण करणे काळाची गरज”*

सावली (प्रतिनिधी/बाबा मेश्राम): सावली वनपरिक्षेत्रात २१ मार्च रोजी जागतिक वनदिन विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. सावली उपक्षेत्रातील सादागड येथील रिंगदेव तलाव परिसर, पाथरी उपक्षेत्रातील भूत तलाव परिसर, राजोली उपक्षेत्रातील कन्हाळगाव परिसर, व्याहाड उपक्षेत्रातील सोनापूर महादेव परिसर तसेच पेंढरी उपक्षेत्रातील मौजा मानकापूर येथे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला इको प्रो चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी निसर्गाची ताकद अफाट असून मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये जंगल व पर्यावरणाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. ही नैसर्गिक संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी जंगलांचे संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

संयुक्त राष्ट्र संघाने वनांचे अस्तित्व आणि संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन २१ मार्च २०१२ पासून जागतिक वनदिन साजरा करण्याची संकल्पना सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने सादागड येथील रिंगदेव तलाव परिसरात आयोजित कार्यक्रमात कसुरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक के. व्ही. खोब्रागडे, कवठीच्या सरपंच कांता बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकर, क्षेत्र सहाय्यक नरेश सिडाम, इको प्रोचे अभय अमृतकर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती सादागडचे अध्यक्ष चंदू गेडाम, व्ही. डी. हजारे, विनायक रेकुलवार, कु. एल. के. सलामे आदी उपस्थित होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मुरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन लंकेश आखाडे यांनी मानले. कार्यक्रमास बोनलवार, सतीश मोजके, बंडू दुधे, नवनीत व इतर पीआरटी सदस्यांसह शुक्र विद्यालयाचे ५४ विद्यार्थी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!