Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस उपनिरीक्षकाची लायकी काढणाऱ्या हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा,अन्यथा आंदोलन करु :- मा.प्रमोद वाघमारे,

पोलीस उपनिरीक्षकाची लायकी काढणाऱ्या हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा,अन्यथा आंदोलन करु :- मा.प्रमोद वाघमारे,

महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.अनिल देशमुख साहेबांनी पोलीस उपनिरीक्षक श्री.साईनाथ अनमोड,यांना न्याय देऊन महाराष्ट्र पोलीसांचा सन्मान करावा,

विदर्भ 24 न्यूज़, जिल्हाप्रतिनिधी

हिंगोली: – गेल्या 3 महिन्यापासून एकीकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचा जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत, तर दुसरीकडे त्याच पोलीसांना शिवीगाळ करून त्यांची लायकी काढली जात आहे. दिनांक 13 जून रोजी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. साईनाथ अनमोड, हे अकोला बायपास येथे आपले कर्तव्यावर असताना, एक अंबर दिवा लावलेली ( MH – 23- AS-7223 ) ही खाजगी चारचाकी गाडी आली त्या गाडीमध्ये हाप नाईट पेंट घालुन बसलेले एक सद्गृहस्थ होते, त्यांना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांनी त्यांचे नाव विचारले असता त्या सद्गृहस्थानी सांगितले की,मी या जिल्ह्याचा आरडीसी आहे.ही गाडी सरकारी नसून माझी खाजगी आहे असे उत्तर दिले. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक यांनी साहेब तुम्हाला खाजगी गादीवर अंबर दिवा लावता येत नाही,असे म्हणतात गाडित बसलेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षक यांना तुझी औकात काय आहे, थांब तुझ्या SP ला फोन लावतो,असे म्हणत अश्लील भाषा वापरण्यास सुरुवात केली. परंतु आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना, साईनाथ अनमोड यांनी गाडी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. ज्यावेळेस चंद्रकांत सुर्यवंशी हे पोलीस ठाण्यात गाडी घेऊन आले असता, पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री.सय्यद यांच्यासमोर साईनाथ अनमोड यांना अर्वाच्य भाषा वापरण्यास सुरुवात केली. जिल्ह्याच्या एका सुशिक्षित आणि जबाबदार अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणे व बोलणे शोभत नाही. श्री.चांद्रकांत सुर्यवंशी हे ज्या गाडीमध्ये बसले होते,ती गाडी सुद्धा एका आरोपीच्या नावावर असल्याचे समजते. त्यामुळे औकातीची भाषा वापरून संपूर्ण महाराष्ट्र पोलीसांचा अपमान करणाऱ्या व पोलीसांची औकात दाखवणाऱ्या श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करुण त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी,जेणेकरून महाराष्ट्र पोलीसांना अशा प्रकारची भाषा वापरण्याची कोणीही परत हिम्मत करणार नाही, त्याकरीता महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.अनिल देशमुख साहेबानी या घटनेकडे स्वतः जातीने लक्ष घालून , पोलीस उपनिरीक्षक श्री.साईनाथ अनमोड, यांना न्याय देऊन महाराष्ट्र पोलीसांचा सन्मान करावा, श्री. साईनाथ अनमोड, यांना न्याय मिळाला नाही तर पोलीस बॉईज असोसिएशन संपूर्ण महाराष्ट्रभर या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोनल करेल, त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारच असेल असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी निवेदणाद्वारे केला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!