Vidarbh24News

Latest Online Breaking News

कधी चालु राहतील शेती संबंधित दुकाने जाणून घ्या.

file photo

file photo

शेती संबंधित दुकाने सोमवार ते रविवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू

चंद्रपूर, दि.15 जून: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. शेती संबंधित दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.
खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांचेशी निगडित उत्पादन, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना, दुकाने संपूर्ण जिल्हाकरिता सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. रविवारला सदर दुकाने पूर्णतः बंद राहतील असे आदेशित केलेले आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
आता खते,कीटकनाशके व बी-बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना,दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.
सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जून ते 30 जून या कालावधीकरीता लागु राहील. तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!