Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून सावली तालुक्यातील आशा वर्कर व परिचारिका यांच्यासाठी भाऊबीज महोत्सवाचे आयोजन संपन्न*

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व नारळ देऊन सत्कार*

*दिनांक:- १५ नोव्हेंबर २०२३*

*सावली(ता.प्र.) :- ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आरोग्य विभागाचा कणा म्हणून गाव स्तरावर कार्य करणाऱ्या, कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर व परिचारिका भगिनींसोबत सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित आशा वर्कर व परिचारिका यांच्या भाऊबीज महोत्सवात काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते मान. नाम.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांनी भाऊबीज साजरी केली.यावेळी भाऊबीज निमित्त भगिनींनी औक्षण करीत ओवाळणी केली.*

*कोरोना काळात आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या माझ्या बहीणींनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचविण्याचे काम केले आहे. त्याचे कार्य अभिमानास्पद असून त्यांचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही यावेळी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली.तसेच सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व आशा वर्कर तसेच परिचारिका यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत भाऊबीज केली साजरी व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शाल व नारळ देऊन नवनियुक्त सदस्य व सरपंच यांचा सत्कार केला*

*यावेळी माजी बांधकाम सभापति मा.दिनेश पाटील चिटणुरवार,जिल्हाध्यक्ष सेवादल मा.सूर्यकांत खनके,माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस चंद्रपूर मा.विनायकजि बांगडे, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.प्रभाकरजी वासेकर,सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजी पं.समिति सभापती मा.विजय कोरेवार, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे, युवक शहराध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,सावली शहर काँग्रेस अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच आशा वर्कर, परिचारिका व काँग्रेस पदाधिकारी,नगरसेवक- नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!