Vidarbh24News

Latest Online Breaking News

खासदार अशोक नेते यांच्याकडून दिवाळीनिमित्त गोरगरीब लोकांना मिठाई, फराळ, फटाके आणि ब्लँकेटचे वाटप

‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान मे’चा कृतिशिल प्रयोग

दि.१३ नोव्हेंबर २०२३

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी ‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान मे’ याचा प्रत्यय दिला. दिवाळीसारख्या सणालाही गडचिरोली शहर परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या गरीब, भटक्या लोकांना त्यांनी विविध साहित्य वाटप करून दिवाळीच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेतले.

हे गोरगरीब लोक दिवाळीसारखा सण साजरा करू शकत नाही. पण खा.अशोक नेते यांनी त्या लोकांच्या ठिकाण्यांवर जाऊन त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरावा यासाठी माणुसकीच्या नात्यातून दिवाळीची भेट म्हणून कपडे, मिठाई, फटाके, फराळ देण्यासोबत आर्थिक मदतही दिली. या अनपेक्षित भेटीने त्या लोकांचा आनंद द्विगुणित झाला.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, गजानन येनगंदलवार, उपाध्यक्ष भारत खटी, ओबीसी आघाडीचे जिल्हध्यक्ष अनिल पोहनकर, न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, भाजपा उपाध्यक्ष अरूण हरडे, माजी जि.प.अध्यक्ष समया पसुला, प्रशांत भुगुवार, संजय बारापात्रे, श्रीकांत पतरंगे, विनोद देवोजवार, श्याम वाढई, अविनाश विश्रोजवार, दतु माकोडे, लोहंबरे, विजय शेडमाके, बंटी खडसे, जनार्दन साखरे, नरेंद्र भांडेकर तसेच भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!