Vidarbh24News

Latest Online Breaking News

२४ तासात पाच अपघाताने सावली तालुका हादरला

४ ठार ६ गंभीर जखमी

सावली तालुक्यासाठी दिनांक 19 ची रात्रौ अनेकांसाठी काळरात्र ठरली. व्याहडखुर्द येथे नृत्यांगना गौतमी पाटील कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी झालेल्या अपघाता मध्ये तीन जण ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले तर आज दिनांक 20 ला दुपारच्या सुमारास दोन दुचाकी एकमेकांना समोरा समोर धडक दिल्याने झालेल्या अपघात मध्ये 1 जण ठार तर 1 गंभीर जखमी झाले आहे.
दिनांक 19 च्या पहिल्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील दाम्पत्य महाकालीचे दर्शन घेऊन दुचाकीने परत येत असताना खेडी फाट्याजवळ गडचिरोली कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात अभियंता असलेला पती प्रमोद जयपुरकर (30) यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी प्रणाली जयपुरकर (22) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

दुसरा अपघात मुख्यमार्गावरील मोखाळा येथे कमलाई महाविद्यालया समोर घडला. यात ट्रॅक्टरला धडक दिल्याने यश हरी सहारे (17) रा. मिंडाळा ता. नागभीड, जयेश महाडोळे (26) रा. चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश विनायक मोहुर्ले (27) रा. मिंडाळा हा जखमी झाला आहे.

दरम्यान तिसऱ्या घटनेत किसाननगर येथे झालेल्या अपघातात सेजल गंगवाणी (25) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी व्याहाड खुर्द येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होते. विदर्भातून अनेक प्रेक्षक आले होते. मात्र गोंधळामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला होता. परत जात असताना सर्वत्र अपघात घडल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शन मध्ये पीएसआय राठोड करीत आहे.
चवथा अपघात २० ऑक्टोंबर ला दुपारी चिमूरकर पेट्रोल पंपासमोर झाला. यात डोमाजी मोहरले वय अंदाजे ४० रा. कापसी ता.सावली आणि ज्ञानेश्वर किसन बोटकावार वय अंदाजे ४१ वर्ष गंभीर जखमी झाले गडचिरोलीच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले.
पाचवा अपघात दोन दुचाकीची सामोरासामोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सावली तालुक्यातील घोडेवाही फाटा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यात दिशांत हर्षद बोरकर ( 25 ) याचा नागपूरला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला आहे. तर दुसरा दुचाकीचालक गंभीर असून त्याच्यावर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!