Vidarbh24News

Latest Online Breaking News

माजी मंत्री मोघेच्या विरोधात निषेध मोर्चा

•हजारो माना समाज बांधव धडकने तहसील कार्यालयावर
चिमूर: माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत नागपूर येथील कार्यक्रमात असविंधानीक वक्तव्य केले.याच्या निषेर्धात आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र तालुका शाखा चिमूर,माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा चिमूर, तसेच समन्व समितीच्या वतीने आज दिनांक ८ आक्टोबर रोज रविवारला दुपारच्या सुमारास हजारोच्या संख्येने काढलेला भव्य निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.


माना जमात ही प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून ” माना ” ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. तिची स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये माना हि जमात क्रमांक १८ वर नमूद आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगांनी “ माना ” जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केलेले आहे. मात्र नागपूर येथील “ आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस ” निमित्य जाहीर कार्यक्रमात माजी सामाजिक न्यायमंत्री श्री.शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत ” हमारी सरकार आयी तो हायर पॉवर कमिशन नेमो. उसमे गलतीसे जो जो जातीया आयी उसमे जो गलतीसे एन्ट्री आयी है उसमे माना भी है. यह माना भी गलत है, यह गोंड माना उसके लिये है. सब माना के लिए नही है यह गलत है इसको निकाल डालो. “अशा प्रकारचे असैविधानिक वक्तव्य केले.
सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या दिनांक ०८ मार्च २००६ च्या निर्णया विरुध्द हे वक्तव्य असुन असे वक्तव्य करून सर्वोच्च न्यायालयाचे अपमान केलेले आहे.माना जमाती संबंधाने वारंवार असे वक्तव्य केल्या जात असते.त्यांचे हे विधान केवळ द्वेष भावना आणि आकसापोटी असून संपूर्ण माना जमातीचा अवमान केलेला आहे. त्यामुळे जमाती जमातीत तेढ निर्माण करून अशांतता व संभ्रम निर्माण होत आहे.नागपूर येथील जाहीर कार्यक्रमात माना जमातीचे विरोधात शिवाजी मोघे यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यावेळी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेटीवार, माजी आमदार नामदेव उसेंडी सुद्धा उपस्थित होते या दोन्ही नेत्याचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात माना जमातीचे वास्तव्य असून त्यांनीही चुकीच्या वक्तव्याचा विरोध केला नाही. याबाबतही जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावेळी चिमूर तालुक्यातुन जवळपास विस हजाराच्यावर माना समाज बांधव मोठ्या सहभागी झाले होते. अंभ्यंकर मैदान येथील हुतात्माना अभिवादन करून शिवाजी चौक – नेहरू शाळा चौक – शहिद बालाजी रायपूरकर चौक – नेहरू चौक – इंदिरा चौक मार्गाने तहसील मध्ये मोर्चा धडकल्या नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यात आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र तालुका शाखा चिमूर,माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा चिमूर, तसेच समन्वसमितीचे प्रतिनिधींची त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रतिनिधी शिष्टमंडळांनी अप्परजिल्हाधिकारी यांना निवेदन देवून शिवाजी मोघे माजी मंत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा.अशी मागणी केली भविष्यात माना जमातीचे विरोधी असे वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र लढा देण्यात येईल. यासाठी शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!