Vidarbh24News

Latest Online Breaking News

*न्यायिक हक्कासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकाराचे सावलीत धरणे आंदोलन*

सावली:प्रा शेखर प्यारमवार

आज दिनांक ११ मे २०२३ ला संपुर्ण भारतात पत्रकारांचे त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आंदोलन करण्यात आले, त्याच अनुषंगाने सावली येथेही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर धरणे आंदोलन खालील मागण्यासाठी करण्यात आले.
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेली जीएसटीची अट रद्द करावी.
४) पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकां इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.


इत्यादी मागण्याचे निवेदन मान.तहसीलदार सावली यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना देशातील पत्रकारांच्या हितासाठी आणि न्याय्य हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या समस्या निकाली काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.संपूर्ण देशात पहिल्यांदाच पत्रकारांच्या हितासाठी आंदोलन आले हे विशेष.
सदर धरणे आंदोलनात जिल्हा संघटक चद्रकांत गेडाम, तालुका अध्यक्ष प्रवीण झोडे, उपाध्यक्ष प्रा.शेखर प्यारमवार, कार्याध्यक्ष प्रा.विजय गायकवाड, सरचिटनिस नासिर अन्सारी ,सहसरचिटणीस उमेश गोलेपल्लिवार,कोषाध्यक्ष नितीन गोहने,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार, संघटक टीकाराम म्हशाखेत्री, प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहने, सदस्य चंद्रकांत प्रधाने,सदस्य गिरीश चीमुरकर, सदस्य सुजित भसारकर, रंजीता नायडू महिला प्रतिनिधि, डिजिटल विंग अध्यक्ष राकेश गोलेपल्लिवार आदींची उपस्थिती होती. आंदोलन स्थळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सरपंच, नगरसेवक यांनी भेट दिली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!