व्हॅलेंटाईन डे विशेष

वाघाच्या दहशतीत वनात मजनुंची “झुंड ” झाली कमी …….
………………………………
संपादकीय
लोकमत दुधे सावली
………………………………
हिर – रांझा, लैला- मजनू ,रोमियो- जूलिएट आदिच्या प्रेम कथा काही औरच, मात्र बदलत्या काळानुरुप प्रेमाच्या परिभाषा बदलत गेल्या. त्यामुळे ‘ प्रेमा तुझा रंग कसा ” ज्याला वाटेल त्याला तसा’ असे म्हणणे वावगे ठरु नये, सध्या तर प्रेम शरीराच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. “नेमकी प्रेमात क्वालिटी कोणाची कशी यापालिकडे प्रेम करावं म्हणून केल जात आहे” त्यामुळे प्रेमाचा शेवट अल्पावधितच होताना दिसून येत आहे, एकेकाळी प्रेमाचे रूपांतर विवाहात होत असून संसार रूपी बाग फुलल्या जायची आता मात्र प्रेम एकासोबत आणि विवाह दुसऱ्या सोबत अशी परिस्थिति पाहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेमचा अंत अल्पावधितच संपुष्ठात येताना दिसतो ” प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत ” अस म्हणत प्रेमाला बहर येताना दिसतो, मजनुंच्या भेट- गाठीच्या आता काही ठाव ठिकाना राहिलेला नाही मिळेल त्या ठिकाणी बसून गप्पा झप्पा मारण्यात दिवस काढ़ल्या जात आहे नैसर्गिक ठिकाण तर भेट – भलाईचे उत्तम साधन मानल्या जात आहे, पर्यटना सोबतच लव्हर पाईंट म्हणुन प्रेमी युगल निसर्ग स्थळी रानावनात, तलावाच्या काठी, शेतशिवारात सुध्दा भेटत असत, आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेत असत, एकमेकांना मिठी मारत आपले प्रेम व्यक्त करीत असत, रानात मजनुची झुंड़ पाहायला मिळत असे. रानातील अनेक भागात मजनू गुलछरे मारताना दिसत असतं, मात्र आता वाघाची वाढलेली दहशत पाहता रानात मजनुंजी झुंड कमी झाल्याचे दिसुन येत आहे,
सावली तालुका वनसंपदेने सम्पन्न असून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे वावर आहे त्यामुळे नेहमीचा वन्यजीवांचे दर्शन होताना दिसते. अनेकदा आमना- सामना होऊन वन्यजीवांच्या हल्यात कित्येक जखमी तर अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे, आता तर जंगल का शेर वाघाने तर कहर केला असून, वाघ रान सोडून लोकवस्तीकडे धूमाकुळ घालत असल्याने सर्वत्र वाघाची दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे वनासह सर्वत्र भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे मजनुनां वनात भेटीगाठी, होण्याचा मार्ग बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे भ्रमणध्वनी जरी जवळ असला तरी जवळ बघुन प्रेमाचा बहर फुलविण्याचे ठिकाण शोधण्याची वेळ निर्माण झाली आहे. पूर्वी वन हे भेटी- गाठीचे उत्तम साधन मानल्या जात असे मात्र आता वाघाच्या दहशतीमुळे मजनुच्या भेटीसाठी वन हे धोक्याची घंटा बनु शकते,गप्पा झप्पा मारताना कुठून वाघ येईल यात शंका नाही, त्यामुळे ‘मजनु विना रान सुने’ दिसत आहे. तालुक्यातील वन संपदेने नाटलेला ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलावासह अनेक ठिकाणं असले तरी वाघाच्या दहशतीमुळे हेही ठिकाण धोकादायक ठरत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानतर बाहेर मिलनाचे ठिकाणी मजनू शोधत असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे प्रेम मिलनाची मोठी समश्या निर्माण होत आहे नुकतेच आता व्हालैंटाईन डे असताना मजनुचे मोठे थवे भटकंती करताना दिसत असले तरी बैठकीची जागा शोधण्याची वेळ निर्माण झाली आहे. एकंदरीत वाघाच्या दहशतीमुळे सर्वांचे जगणे कठिन होऊन बसले आहे त्यामुळे साहजिकच वनात मजनुची झुंड कमी झाल्याचे चित्र निर्माण होत आहे …..