Vidarbh24News

Latest Online Breaking News

आदिवासी मुलींच्या वसतिगृह स्थांनातराचे आदेश धडकले

आदिवासी मुलींच्या वसतिगृह स्थांनातराचे आदेश धडकले
अखेर आदिवासीं मुलींना मिळाला न्याय

सावली तालुक्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या मुख्यालयी आदिवासींच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक दर्जा व शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून शासकीय आदिवासी मुल, मुलींसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली . दोन्हीही वस्तीगृहाला शासकीय इमारत नसल्यामुळे सध्या खाजगी इमारती मध्ये भाडेतत्त्वावर वस्तीगृह सुरू करण्यात आले मात्र मुलींची वस्तीगृहातील संख्या ५७असून चार रूम , संडास दोन ,बाथरूम दोन असल्याने मुलींना शौचालयाला जाण्यासाठी व आंघोळ करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते होते त्यामुळे मुलींची शाळेच्या वेळेवर तयारी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा शाळेतिल वेळेचा खेळ खंडोबा होत होता चार रूम असल्यामुळे प्रत्येक खोल्यामध्ये १०/१५ मुलींना पलंग नसल्यामुळे खाली आणि एक गादी वर दोन दोन मुली झोपन्याची वेळ निर्माण झाली आहे गर्दीमुळे अभ्यासावर सुद्धा मुलींच्या परिणाम होत आहे त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सुद्धा मुलींना सहन करावे लागत होता आदिवासी मुलींचे वस्तीगृह नॅशनल हायवे ला लागून असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज येत होता आणि दोन्ही बाजूला दारुचि दुकाने असल्यामुळे अनेकदा दारू पिणारे व्यक्ती आंबट शौकीन मुले केव्हा केव्हा मुलींना बघून शिट्ट्या मारत असायच्या या ठिकाणी ग्रंथालय नाही, पार्किंग नाही, प्लेग्राउंड नाही आदि अनेक समश्या होत्या.आदिवासी  मुलींना शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे  जावे लागत होते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत असल्यामुळे सावली तालुक्यातील सध्याचे असलेले मुलींचे वस्तीगृह इमारत बदलवून दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी विद्यार्थ्यांनी गृहपाल व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे त्याचप्रमाणे सावली तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे मागणी करून एक महिन्याचा कालावधी लोटलेला होता प्रकल्प अधिकारी मागण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे संघटना आणि पालक यांच्या कडून बोलले जात होते.


तालुक्यातील मुलींच्या वस्तीगृहाला प्रकल्प अधिकारी मृगनाथन व त्यांच्या कमिटीने प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि मुलींना होत असलेली गैरसोय जाणून घेतली व दोन दिवसांमध्ये इमारत आम्ही बदलवून देण्याचे मुलींना आश्वासन देण्यात आले.
त्यामुळे विद्यार्थिनींनी एक लेखी तक्रार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेला दिले विद्यार्थ्यांनीच्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याकरिता संघटनेकडे लेखी तक्रार दिल्याने नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सावली येथील मुलीच्या वस्तीगृहासमोर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, लखन मेश्राम, रमेश कनाके, उतम गेडाम, पुरुषोत्तम पेंदाम, भास्कर गेडाम, श्यामसुंदर उइके आदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता.

हीच ती नवीन स्वतंत्र भव्य इमारत

प्रकल्प अधिकारी यांनी 13 जानेवारीला तशी रितसर जाहिरात दिली होती. प्रकल्प कार्यालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार तसेच प्रकल्प अधिकारी यांच्या दोन भेटींचा प्रत्यक्ष अहवाल यांचे अधीन राहून  आदिवासी विकास विभाग प्रशासकीय यंत्रणेने सदर कार्यवाही केलेली आहे. तसेच नवीन प्रभारी महिला गृह्पालाची नेमणूक करण्यात आली.
आदिवासी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर आदिवासीं मुलींना वसतिगृह स्थानांतर करण्याचें आदेश 18 जानेवारीला प्रकल्प अधिकारी मृगनाथन यांनी गृहपाल, आदिवासी मुलींच्या वसतिगृह यांना पाठविण्यात आले आहे. यमध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, राकेश दंडमवार यांच्या इमारती तून सोनाली भंडारे यांच्या स्वतंत्र इमारतीत स्थानांतरित करण्यात यावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!