Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ओबीसी विद्यार्थी वसतीगृहामध्ये बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांचा समावेश करा*..

*ओबीसी विद्यार्थी वसतीगृहामध्ये बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांचा समावेश करा*..

“राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी”

*सावली*

ओबीसी विद्यार्थी वस्तीगृहात बिगर व्यावसायिक कोर्स करणाऱ्या विद्यार्थांचा समावेश करा अशा मागणी चे निवेदन — राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका सावली च्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन
देण्यात आले
,राज्य सरकारकडे ओबीसी विद्यार्थी वसतीगृहासाठी निधी नसल्याचे कारण समोर करीत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे , तसेच या परिपत्रकात अन्य बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना वसतिगृहाची योजना लागू करण्या संदर्भातील कोणताही उल्लेख नाही. सदर वसतीगृहे चालविण्यासाठी नव्याने मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५० व संस्था नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ (N.G.O.) ना वसतीगृह चालविण्यासाठी तयार असल्यास अशा संस्थाना प्रत्येक जिल्ह्यात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुल व १०० मुली या मर्यादेत प्रति जिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यासाठी एकून ७२०० पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय पुरविण्यासाठी राज्य शासनाने मान्यता देण्याचे घोषित केले आहे.
शासकीय वसतीगृह निर्माण न करता इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्था/(N.G.O.) यांना वसतीगृह चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. अशा एनजीओ कृत वसतीगृहांचा दर्जा काय असेल ? तसेच एससी, एसटी प्रवर्गाप्रमाणे स्वतंत्र वसतिगृहे का नाही? तसेच एससी, एसटी प्रवर्गाप्रमाणे स्वाधार योजना का लागू करण्यात आली नाही ? असे प्रश्न राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने उपस्थित केल आहेत
. या आदेशामुळे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होईल, हे परिपत्रक मागे घेवून राज्यातील प्रत्येक जिल्हात ओबीसी विद्यार्थांसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापित करा अन्यथा महाराष्ट्र राज्यभर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ तीव्र आंदोलन करणार असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सावली तालुका अध्यक्ष कवींद्र रोहणकर,कांग्रेस तालुका अध्यक्ष नितिन गोहणे,तुळशिदास भुरसे, सुनील पाल,निखिल सुरमवार,किशोर.घोटेकार,जितेश सोनटक्के, सुरज किनेकार ई .कार्यकर्त उपस्थित होते..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!