Vidarbh24News

Latest Online Breaking News

जय संघर्ष वाहन चालक मालक यांचा अधिवेशनावर मोर्चाचे आवाहन

जय संघर्ष वाहन चालक मालक यांचा अधिवेशनावर मोर्चाचे आवाहन

व्याहाड खुर्द : ई चालान ऐवजी ऑफलाईन चालान आकारावे, खासगी वाहन चालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख व मृत्यू झाल्यास 25 लाखांची आर्थिक मदत द्यावी, दलित व आदिवासी संरक्षण कायद्या प्रमाणे वाहन चालकास होणाऱ्या मारहानीला आळा बसवा यासाठी कायद्यामध्ये कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात यावी, देशातील पर्यटन व धार्मिक स्थळी चालकांच्या विश्रांतीची सोय करण्याची तरतूद करण्यात यावी, वाहन चालकासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना कार्यान्वित करावी व 30 हजार वरून एक लाख रुपये पर्यंत तरतूद करण्यात यावी अशा विविध समस्याच्या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था तर्फे उद्या दि. 20 डिसेंबर ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र जिल्ह्यातील खासगी वाहन चालक मालकांनी जास्तीत जास्त सख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर टोंगे महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रसार प्रमुखांनी केला आहे.
राहुल रायपुरे, व्याहाड खुर्द.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!