Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर ते सावली पदयात्रा आज चरखा संघात दाखल होणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या प्रोफेशनल यांच्यावतीने आयोजित चंद्रपूर ते सावली या तीन दिवसीय पदयात्रेला शुक्रवार प्रारंभ झाला. महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून यात्रेला सुरुवात झाली स्थानिक खासदारांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सावलीच्या दिशेने रवाना केले. ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. तब्बल तीन दिवस 75 किलोमीटरचे अंतर पार करून दोन ऑक्टोबरला म्हणजे आज सावली चरखा संघात या पदयात्रेचा समारोप होणार आहे सध्या राहुल गांधी हे कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळवित असताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर ही यात्रा काढण्यात आली आहे पहिल्या दिवशी चिचपल्ली येथील एका शाळेत या यात्रेकरूंनी मुक्काम केला आहे यात्रेला सुरुवात करताना काँग्रेसचे सेवा दलचे अध्यक्ष सूर्यकांत खंडके, योगानंद नंदनवार, एडवोकेट प्रतिशा साधना, योगानंद चंदनवार, शरीफ गुरुजी एजाज शेख भूपेश रेगुंडवार उत्तम पाल, धनंजय शास्त्रकार कामरान अन्सारी यांच्यासह चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे इंटकचे के के सिंह, महिला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, नंदू नागरकर, स्वाती त्रिवेदी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, बापू अन्सारी, गोपाल अमृतकर, अख्तर सिद्दिकी इत्यादी लोक उपस्थित राहणार आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!