Vidarbh24News

Latest Online Breaking News

मारेगाव येथे 7 में रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

•पक्षकारांनी लाभ घ्यावा- न्यायाधीश एन.पि.वासाडे

मारेगांव( 6 मे ):- उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मारेगाव तालुका विधी सेवा समिती व मारेगाव न्यायालयाच्या वतीने शनिवारी दि. 7 में 2022 रोजी मारेगाव न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होउन पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधिश मारेगाव श्री. एन.पि. वासाडे यांनी केले आहे.

न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे तुंबून पडली आहेत. त्यामुळे गोरगरीबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होत नाही. पक्षकारांची वेळ व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय उपयुक्त असून याद्वारे सामोपचार तडजोडीतून न्यायालयीन प्रकरणात दोन्ही बाजूंचे समाधान होउ शकते.

न्यायालयावरचा भारे कमी होउन गोरगरीबांना समाधानाने व लवकर न्याय मिळू शकतो. त्यामुळे लोक न्यायालयाकडे लोकांना कल वाढला आहे. या प्रक्रियेत लोकांमध्ये लोकन्यायालया विषयी अधिक विश्वास निर्माण झाल्यास लोकन्यायालयाची चळवळ अधिक बळकट होउ शकते, असे मत न्यायाधीश एन. पी. वासाडे यांनी व्यक्त केले.

उद्या शनीवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायलयात मोटार वाहन कायदा अंतर्गततची प्रकरणे निगोशिएबल इन्टुमेंट अॅक्ट कायद्या अंतर्गतची कमल 138 ची प्रकरणे बँक व फायनान्स कंपनीचे वसुली प्रकरणे, भुसंपादन प्रकरणासह शेतजमिनी विषयक प्रकरणे, कर भरणा, वीज बिल पाणी बील प्रकरणासह फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वैवाहित व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश राहणारे आहे.

या न्यायालयासाठी न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असलेले सहा पॅनल्स तयार करण्यात आले आहे. या लोक न्यायालयाला पक्षकारांनी सहयोग द्यावा, असेही आवाहन मारेगाव न्यायाधीश एन.पि. वासाडे यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!