५० ते ६० टन हेवीलोड वाहतुकीमुळे अल्पावधीतच “रस्त्याचे वाजले की बारा ……”
•गावकऱ्यांनी दिले आमदारांना निवेदन
•नवीन रस्त्याची झाली ऐसी-तैसी कोलवॉशरीचा नाकर्तेपणाने झाली ही गत…..
•नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा येत्या १५ दिवसात कामबंद आंदोलन करण्यात येईल.
वणी( 28 एप्रिल) :- तालुकास्थळापासून कळमणा खुर्द ते वणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे कोलवाशरीचा व कोल्डेपोचा 50 ते 60 टनाचा हेविलोड वाहतुकीने मोठ मोठे खड्डे तयार झाले आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांना गटारांचेही स्वरुप प्राप्त झाले असून यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र अद्यापही येथील कोलवाशरी व अनेक कोल डेपो धारकांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले . तरीही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे स्पष्ट आरोप सरपंच व सदस्य करीत आहे.तसेच हा नवीन करण्यात आलेला रस्त्ता यांचा जड वाहतुकीनेच खराब झाले आहे तरीही जबाबदार कोल डेपो व वॉशरीचा प्रशासनाने दुरूस्ती केली नाही. परिणामी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे.
येथील गावकऱ्यांना वणी येथे किंवा इतर कोणत्याही गावाला जाण्यासाठी कळमना खुर्द ते वणी हा एकमेव रस्ता असून सदर रस्तावरून कोल डेपो व कार्तिक कोल वाशरी ५० ते ६० टन हेवी लोड वाहतुकीमुळे रस्तापूर्ण खराब व खड्डे पडलेले आहे. पूर्णपणे रस्ता उखडला असल्यामुळे धूळ व कोळसाच्या डस्टमुळे समोरील वाहन दिसत नाही. बरेचदा छोटे मोठे अपघात झालेले आहे. त्यामुळे नागरिकाच्या ‘जीवाला धोका झालेला आहे. 
कळमणा (खुर्द) ते वणीकडे जाणारा रस्तात येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. मात्र रस्ताचा वापर येथील कोलवॉश्री व येथील मुजोर कोल डेपोचा जड ट्रकांसाठी करीता करण्यात येत असल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. 
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन वाहने चालवितांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामार्गे नोकरी करणारे, व्यावसायीक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात.त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावर मोठ मोठ्ठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन जावे लागते. गर्भवती महिलाला त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो व चिखलगाव वासी यांना शेतामध्ये जाण्यासाठी त्यांना पण खूप त्रास सहन करावा लागतो.याच ठिकाणी चार व्यक्तींचा या खड्यात पडून नाहक बळी गेल्याची घटना घडल्या आहेत.त्यामुळे कोल्वॉशरी प्रशासनाने व कोल डेपो धारकाने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, 

नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा येत्या १५ दिवसात आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा नाईलाजाने घ्यावा (लागेल याआधी सुद्धा कोल डेपो धारक व प्रशासनाचे वतीने आम्हाला आश्वासन देण्यात आलेले होते. परंतु प्रयन्तनाथ कार्यवाही मात्र झालेली नाही,
म्हणुन येत्या १५ दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील सरपंच व ग्रा. पं सदस्यांनी दिले.निवेदन देत असतांना गावातील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते.
गावकरी निवेदन देताना……… क्षण…..

कोड:-
“खनिज विकास निधीमधुन काम पुर्ण में महिन्यात झाले होते त्यानंतर १ महिन्यात पुर्णतः तो रस्ता फुटला होता त्यानंतर या रस्त्याने असलेले कार्तिकेय कोल वॉश्री व कोल डेपो ( नरेश जैन कोल डेपो, दासभाई कोल डेपो व लक्ष्मी कोल डेपो आगे 2 महावीर कोल डेपो, जैन कोल डेपो © नरेश पाटील कोल डेपो @ मनिष अग्रवाल कोल डेपो व आदित्यनाथ कोल डेपो या सर्व कंपनीचा ओवरलोड ट्रकामुळे ५० ते ६० टन मालाची वाहतुक होते व त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक होत असल्यामुळे रस्ताची खराब दुर्दशा झाली आहे. तारीख 7/8/2018 ला उपविभागीय यांना पत्र देण्यात आले होते हि १६/८/२०१९ या पर्यंत तोडगा काढावा अन्यथा आम्ही आंदोलन करेन व १७/०८/2019 व जनआंदोलन भाग पाडेल व त्या नंतर ओदोलनाला दिवशी आपले वणी पोलीस स्टेशनचे मा. ठाणेदार साहेब आदोलन स्थळी आले होते व आम्हाला थांबविले व मिटींग रेस्ट हाउसला बोलावून मिटींग घेण्यात आली. दिनांक 17/8/2019 वेळ सायंकाळी ८ते ९चा दरम्यान मीटिंग घेण्यात आली. उपस्थित sdo साहेब , आमदार , सभापती ,ठाणेदार, जि. प. इंजी मानकर ,सरपंच, ग्राप सदस्य ,गावकरी व संबंधित प्रशासन व मालक उपस्थित होते. त्यावेळेस जी. प. रस्ता सोडून साईड सर्व्हिस रस्ता काढून देऊ असे नोटीस द्वारे आश्वासन कार्तिकेय कोलवाशरी व कोल डेपो यांनी दिले तेही ५ते ६ महिन्यात साईड सर्व्हिस रस्ता बनवून देऊ अशी लिखित माहिती कलमणा ग्रामपंचायतला दिली. व अद्यापही त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.”- राहुल क्षीरसागर (माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. प. सदस्य, कळमना (खुर्द) )



