Vidarbh24News

Latest Online Breaking News

ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले : डॉ. नागदेवते

ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले डॉ. नागदेवते

चंद्रपूर, दि. 8 जून: विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या कथित टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी व शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी चिमूर तालुक्यातील मौजा आंमडी बेगड येथे शालिक विटाळी यांच्या शेतामध्ये  डॉ. तांबे, डॉ. सवई, डॉ. बोरकर या शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नागदेवते, डॉ.देशपांडे उपस्थित होते.तथापी,ही टोळधाड नसून नाकतोड्यांचा हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये टोळधाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा  दिला आहे. कृषी विभागामार्फत या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या आहेत.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या भेटीमध्ये शेतात आढळून आलेली पिल्ले ही टोळधाडीची नसून ती नाकतोड्याची आहेत. त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. एकही टोळधाडीचे प्रौढ कीड पिकांवर आढळून आले नाही. त्यामुळे शेतातील कोणत्याही प्रकारच्या झाडांना व वनस्पतींना त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. तसेच या नाकतोड्याचे प्रमाण खूप कमी असल्याने यापासून शेतातील पिकाला काहीही धोका नाही. असे शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!