Vidarbh24News

Latest Online Breaking News

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदान शिबीराला उत्कृष्ट  प्रतिसाद

विशाल महामंडरे /विदर्भ 24 न्युज

ग्रामीण प्रतिनिधी, बोथली 

देशात कोरोना वायरसने थैमान घेतल्यामुळे प्रशासनाने प्रादुर्भाव प्रतिबंध उपाय म्हणून अनेक योजना राबवित आहे त्याचप्रमाणे सावली तालुक्यातील भाजपा पार्टीतर्फे पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन कृषि उत्पन्न बाजार समिती येथे घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजित तालुकास्तरावरील भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन चिमूर-गडचिरोली लोकसभेचे खासदार मा.श्री अशोकजी नेते यांचा शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

                 सावली येथील भाजपा पार्टीने आज पर्यन्त अनेक उपक्रम राबवून सेवा देणाऱ्यापासून ते सामान्य माणसांना सेवा देत आहे. उपक्रमाद्वारे मास्क व सनिटायझर वाटप, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवित आहेत. त्याचप्रमाणे सावली येथील कृषी उत्पन्न समिति बाजार येथे दि. ३१ मे रोज रविवारला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

                 कोवीड- १९ प्रतीबंध करण्यासाठी जागतीक स्थरापासुन त खेड्यातील व्यक्तींला यापासून सुरक्षीत करण्यासाठी केद्र व राज्य सरकार सर्वस्थरावरुन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्ग प्रतीबंधा करीता राज्यातील आरोग्य, महसुल पोलीस, विभागाबरोबर अनेक कर्मचारी जिवाची पर्वा न करता एक विश्वयुद्ध योद्धया प्रमाणे लढत आहेत.

                 राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या आव्हानानुसार राज्यात भविष्यात उद्भवना-या आपातकालीन परिस्थीतीत ब्लड बँकेत आवश्यक रक्त पुरवठा लक्षात घेता दि. ३१ मे रोजी सावली येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय जनता पार्टीतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

                   रक्तदान शिबिराला गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जि. प. सदस्या योगिता डबले, जि. प. सदस्या मनीषाताई चिमूरकर, माजी सभापती तथा प. स. सदस्या छायाताई शेंडे, भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत संतोषवार, बाजार समिती संचालक डॉ. तुषार मर्लावार, अर्जुन भोयर,प्रकाश पाटील गड्डमवार, कृष्णा राऊत, सौ. मानसी लाटेलवार, दिपक शेंडे आदी उपस्थित होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!