कायर येथील चौकातील धुळीमुळे नागरिक त्रस्त , जीवितहानी होण्याची शक्यता बळकावली…..
★रस्त्यावरील धुळसाठी पाणी टाकण्याचे प्रयोजन ठेकेदार किंवा संबंधित प्रशासनाचे कार्य नाही का हो साहेब ?….
★प्रशासन जिवितहानी होण्याचा प्रतिक्षेत का?
◆सकाळ आणि संध्याकाळ पाणी टाकन्यात हलगर्जीपणा का ?
वणी ( 7 .एप्रिल) :- तालुक्यातील कायर येथे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य चौफेर दिसून येत आहे .येथील चौफुलीवर रस्त्याचे काम झाल्यावरही यावर पाणी मारण्याचे काम थंडबस्त्यात होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कायर -मुकुटबन रस्त्याचे कार्य मोठ्या प्रमाणात जोरात सुरू आहे .परंतु कायर येथील चौफुलीवर मात्र खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे . तेथील पाणी मारण्याचे कार्य कोणतेही प्रशासन किंवा ठेकेदार करत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील धुळीच्या त्रास होत असताना देखील येथील सम्बंधित प्रशासन निद्रावस्थेत का आहे ? असा स्पष्ट प्रश्न नागरिक करत आहे.संध्या झाले की समोरची गाडी सुद्धा त्या धुळीमुळे लोकांना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांना तेथील आरोग्याची( खोकला,अस्थमा ) सारख्या रोगाची भीती व अपघाताची भीती निर्माण झाली आहे.सकाळ आणि संध्याकाळ झाली की ,रस्त्यावर पाणी टाकण्याचे कार्य हे संबंधित विभागाचे असते.असे असले तरीही येथील संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.महत्त्वाचे म्हणजे, ठेकेदार रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक असताना देखील मारताना दिसून येत नाही.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे .या उडत असलेल्या धुळीने अपघाताला व रोगाला जणू काही आमंत्रणच देत आहे की काय ?. कुणाचे जीवित हानि झाली किंवा आरोग्याची जबाबदार कोण घेणार ?असे संतप्त प्रश्न नागरिक करीत आहे.



