समता संघर्ष समाज परिवर्तन संघटने तर्फे “समाज प्रबोधन कार्यक्रम”

बहुजन चळवळ हिचं देशहितासाठी दुसरा पर्याय!
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याच्या जेष्ठ पदाधिकार्यांची उपस्थिती.
गडचिरोली/चामोर्शी येथे दिनांक 28/01/2024 रोजी रविवारला ठिक 12 वाजता स्थळः चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे “समाज प्रबोधन कार्यक्रम” संपन्न. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मा. कांशीराम साहेब यांच्या “जाती तोडो समाज जोडो” या स्वाभिमानी चळवळ व स्व आत्मसन्मान जीवन जगण्याचा समाजबांधवांना प्राप्त होने हा मुलभूत अधिकार आहे आणि ही आपली हजारो वर्षांपासून चाललेली लढाई आहे. आपल्या पुर्वजांचा इतिहासातुन धडा घेऊन त्यांच्या विचारांने प्रेरित होऊन समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभाकर इटकेलवार राँऊ. ऑफिसर यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी किशोर नगराळे सर मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लक्ष्मण मोहुर्ले, सा. का. गडचिरोली, रुपेश वालकोंडे, संघटनेचे अध्यक्ष, स.स.स.प.सं. महाराष्ट्र राज्य, राजेश कलगट्टीवार, बबण गोरंतबार सरपंच पोंभुर्णा, दिंगाबर लाटेलवार, प्रभाकर वासेकर, धर्मराव तानादु विजय देवतळे, मायाताई मोहुर्ले, अध्यक्ष, महिला आघाडी गडचिरोली, अनिता जील्हेप्पल्लीवार सरपंच, किशोर नरुले, शेखर पुल्लीवार, मंदीप गोरडवार सा. का. विनोद आस्मपल्लिवर राहुल जीलेपल्लिवार.
यावेळी समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते. तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समाजबांधव श्री. परमेश्वर मोहुर्ले, अध्यक्ष चामोर्शी, परशुराम बोलीवर, उपाध्यक्ष चामोर्शी, , रमेश मोहुर्ले, सुभाष कोहळे, विकास मोहुर्ले, पुरुषोत्तम मोहुर्ले, भावना बोलीवर, जयश्री रामटेके, कोमेश्वर बोलीवार, प्रकाश मोहुर्ले, दुर्योधन देवगडे, उमाजी कोहळे, नल्लुजी घोगरे, वसुधा वासेकर, वाकडी, गुरुदास जील्हेवार, सौ. कल्पनाताई मोहुर्ले, विद्या वासेकर, प्रिती वासेकर, पुनम इटकेलवार, शंकर वासेकर वाकडी, कोमेश्वर बोलीवार, भोगनबोडी, चंद्रदास इटकेलवार, गोकुळ मोहुर्ले, पुरुषोत्तम मोहुर्ले, बाबुराव पौरकार, सुभाष कोहळे, प्रमोद रामटेके, विकास मोहुर्ले, नामदेव देवताळे, इत्यादी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बहुजन चळवळीत उत्साहाने सहभागी झाले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व समाज बहुजन समाजाची निर्मिती करुन शासक बनण्याची वाटचाल करने व परिवर्तन करने काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. धर्मराव नागोराव दुर्गमवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. मंदीप गोरडवार सा. का. गडचिरोली यांनी केले.