विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा*

सावली : भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी पर्यंतच्या तमाम थोर क्रांतिकारकांना तसेच भारताच्या सीमारेषेला प्राणाच्याही पलीकडे जाणाऱ्या सैनिक वीर शहिदांना सलाम करून विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे ध्वजारोहण भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप भाऊ गड्डमवार यांच्या हस्ते संपन्न झाले. संविधानाचे महत्त्व,देशाचे संविधान किती महत्त्वाचे आहे तसेच शाळेच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीचा आढावा कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मधून विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र मुप्पावार यांनी मांडले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगिडवार,कोषाध्यक्ष डॉ. विजय शेंडे,सल्लागार राजुभाऊ बेजगमवार, सुधाकर गाडेवार,प्रशांतजी राईंचवार,चरणदास बोम्मावार,मोतीलाल दुधे,गुणवंत सुरमवार,विद्यालाचे माजी मुख्याध्यापक केवलरामजी खेवले,संतप्रकाश शुक्ला,भोगेश्वर मोहरले, वीरेंद्र गड्डमवार प्राचार्य अमृतवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे मनोरे,कवायत,लेझीम, देशभक्तीपर नृत्य आणि भाषणे सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या संचालन प्रा. धनंजय गुरगुले तर आभार पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.