*प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळकरी मुलांची केली कटिंग मोफत

*बोथली येथील न्यू लक्की जेन्टस पार्लरचा उपक्रम*
सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
सावली तालुक्यातील बोथली स्थित बाळकृष्ण गोरडवार यांचे न्यू लककी जेंट्स पार्लर या नावाने बस स्टॉप लगत मागील तीन वर्षापासून सलूनचे दुकान आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा सर्व महापुरूषांना अभिवादन करून त्यांनी दिनांक २५ जानेवारी २०२४ रोज गुरुवारला सकाळी ०७:०० ते ०५:०० या वेळां मध्ये वर्ग पहिली ते बारावी वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या बोथली परिसरातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आपल्या दुकानात मोफत कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.आणि त्याने तसे आवाहन केले.त्या आवाहनाला दाद देत बोथली,केशरवाही पांढरसराड,हिरापूर,पेंढरी,चक पिरंजी येथील गरीब व होतकरू ४५ विद्यार्थ्यांनी हेअर सलून मध्ये आपली कटिंग अगदी मोफतरित्या करून घेतली.
बाळकृष्ण गोरडवार बोथली गावातील गरीब सुशिक्षत युवक असून त्याने बारावी नंतर डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.परंतु सरकारच्या शिक्षक भरती बंदीच्या धोरणामुळे बाळूला नौकरी मिळू शकली नाही.परंतु त्याने आपली जिद्ध सोडली नाही.नागपूर मध्ये त्यांनी कटिंग व्यवसाय शिकले.परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्याने गावाकडची वाट धरली.त्यातच त्याने बोथली येथे न्यू लक्कि जेंटस पार्लर या नावाने दुकान सुरू केले.७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी हा आगळा वेगळा उपक्रम करून दाखविल्याने बाळकृष्णचे बोथली आणि परिसरात गावातील नागरिकांनी कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.