*सावली तालुक्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात*

*तालुक्यातील जनतेने सहकार्य करण्याचे तहसीलदार यांचे आवाहन*
सावली: राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुला प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम २३जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाच्या कामाकरिता तालुक्यातील ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहाय्यक, शिक्षक व इतर कर्मचारी मिळून एकूण ३०० प्रगणक आणि २२ पर्यवेक्षकांची नियुक्त केलेले आहेत.
दिनांक २१ व २२ जानेवारी रोजी तालुकास्तरावर सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शनात सहभागी सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कामकाज करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे,या सर्वेक्षणात तालुक्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रयोगातील कुटुंबासाठी प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे आणि हे सर्वेक्षण मोबाईल ॲप द्वारे होणार आहे.
बाईट
सर्वेक्षण करण्याकरिता प्रगणक म्हणून ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांना तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे.माहिती देतांना मनात कुठलीही मनात शंका निर्माण करू नये.कुटुंबाची सर्व माहिती गोपनीय ठेवल्या जाईल.
मान .परिक्षीत पाटील…
तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी सावली.