बोलेरोची दुचाकिला धडक एक ठार दोन गंभिर

सावलीतील एस एस बार समोरील घटना
सावली: राष्ट्रीय महामार्गावरील सावलीच्या आर एस बार जवळ दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने एक महिला ठार तर दोन गंभिर जखमी झाले.
राजगड येथील मेहुण्याचा लग्न आटोपून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीला क्र. एम एच ३३ जे १४९४ बोलेरो पिकंअप क्र. एम एच ३१ डी एस ०९३९ ने धडक दिल्याने शोभा धारणे वय ४९ वर्षे राहणार विहीरगाव (बोरमाळा) हिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील निखिल हिवराज गायकवाड वय २३ वर्षे विहिरगाव (बोरमाळा), धर्मराव पांडुरंग गायकवाड वय ४५ वर्षे विहिरगावं (बोरमाळा) हे गंभिर जखमी आहेत. सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. सावलीचे नवनियुक्त ठाणेदार राजगुरू यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे.