निर्मला मोहुर्ले उपचारासाठी संघटनेचा पुढाकार

निर्मला सुखदेव मोहुर्ले यांच्या उपचारच खर्चासाठी अखिल भारतीय मादगी समाज संघटना आली पुढाकार घेतला.
मौजा कुरूल तालुका चामोर्षी जिल्हा गडचिरोली येथील निर्मला सुखदेव मोहुर्ले ह्या दीर्घकाळापासून नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचार घेत होत्या त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून संघटेचे पदाधिकारी यांचेशी संपर्क केल्यावर तेवढ्याच उत्फुसरतेने सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी पुढे येवून सढळ हाताने मदत केली परंतु ती मदत सुद्धा त्यांच्या मृत्युच्या झुझल हरवू शकली नाही. शेवटी आज त्यांनी आपले प्राण सोडले असून निर्मलाबई चे नातेवाईकांनी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे आभार मानले आहे.