किशोर पगडपल्लीवार यांचा भाजपात पक्ष प्रवेश

बेंबाळ: आज प्राण प्रतिष्ठेच्या शुभ दिवशी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे पदाधिकारी तथा बेंबाळ येथील ग्राम पंचायत सदस्य किशोरपगडपल्लीवार यांचं त्यांच्या सहकारी समवेत भाजपात प्रवेश केला.
चंद्रपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी ,तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं विकासकामांना प्रभावित होवून बेंबाळ येथील सामजिक कार्यकर्ते ,अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे पदाधिकारी ग्राम पंचायत सदस्य किशोर पगडपल्लीवार , त्यांचे सहकारी सामजिक कार्यकर्ते तथा कुरमार समजाचे पदाधिकारी मुन्ना भाऊ मुद्रिकवार यांनी पक्ष प्रवेश केला.
सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते प्रदीपभाऊ सोयाम यांचं नुकताच भाजप प्रवेशकेला त्यावेळी अनेंक कार्यकर्ते उपस्थित होते.