जुनोना येथे जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेचे उदघाटन

कलाम फाउंडेशन, चंद्रपूरचे आयोजन
जुनोना गावातील कलाम फाउंडेशन चंद्रपूर यांच्या सौजन्याने आयोजित जिल्हास्तरीय भव्य पुरुषांचे खुले कबड्डी सामन्याचे शनिवार ला थाटात उदघाटन झाले . स्पर्धा २० जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान होत असून, शनिवारी सायंकाळी ७.०० वाजता स्पर्धेचे उदघाटन श्री. संदीपभाऊ गिऱ्हे जिल्हाप्रमुख, शिवसेना चंद्रपूर यांनी केले.
याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हूणून जुनोना गावचे सरपंच श्री. विवेक शेंडे, प्रमुख पाहुणे श्री. गंगाधर वैद्य सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, प्रा.अनिल डहाके, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर , सौ. बबिताताई चालखुरे सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर, चंदाताई देवगडे तंटामुक्ती अध्यक्ष समिती जुनोना, श्री. संदीप पारवे, वनरक्षक, तसेच जुनोना गावचे ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाम फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशिक शेन्डे, संचालन उपाध्यक्ष प्रेम जरपोतवार तर आभार कोषाध्यक्ष शिवशंकर बांदूरकर यांनी मानले. आणि श्री मधुभाऊ मेश्राम सामाजिक कार्यकर्ता अजयपूर यांच्या कार्यक्रमास शुभेच्छा लाभल्या. यावेळी कलाम फाउंडेशन चे सदस्य कुलदीप पाटील, सुनील कातकर, क्षितिज शेंडे, संदीप मेश्राम, निकेश चहांदे, दीक्षित शेंडे,सोनू लाईणकर, सोमेश्वर पेंदाम तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.