सिंदोळा येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त वृक्षारोपण

सावली: अयोध्येला ५०० वर्षाच्या कालावधीनंतर भव्य दिव्य मंदिर उभारून आज २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. घरोघरी दिवे लावून, पूजा अर्चना करुन संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
असाच काहीसा आनंद सोहळा सावली तालुक्यांतील सिंदोळा गावात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. गावातील चौकाचौकात रांगोळ्या टाकण्यात आल्या. हनुमान मंदिर परिसर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण गावातील नागरिकांनी केले.
यावेळी सिंदोळा गावच्या सरपंच गिता मनोहर चौधरी, सदस्य विजय मेश्राम,अतुल जवादे, पंकज चौधरी, किशोर घोटेकर, सचिन म्याकलवार, अक्षय म्याकलवार, सचिन चौधरी, प्रेमदास म्याकलवर , ईश्वर बाबंनवाडे , शाहरुख चौधरी आणि गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.