राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण

सावली: राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिबगाव येथे आयोजित महाविद्यालयस्तरीय विशेष शिबिरात दिनांक 20 जानेवारी 2024 ला रोटरी क्लब चंद्रपूरच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष मान. अनुप कुमार यादव, मान. संजय उपगंन्लावार, मान.सचिन गांगरेड्डीवार, डॉ. निशा कुमार, डॉ. राजश्री मार्कंडेवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर, प्रा. स्मिता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचा जिबगाव व आजूबाजूतील परिसरातील नागरिकांना फार मोठा लाभ झाला. तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करून मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. या शिबिराचा लाभ 200 नागरिकांनी घेतला. या शिबिराच्या यशस्वीवितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी व जिबगाव ग्रामवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.