Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्रभावी माध्यमामुळेच शासन ,प्रशासनात पारदर्शकता -खासदार अशोक नेते

* पत्रकार दिन आणि सत्कार समारंभ सोहळा *
* प्रेस क्लब चा उपक्रम *
* उद्योजक,मूर्तिकार सन्मानित *
सावली ( लोकमत दुधे )
आपल्या प्रभावी लेखणी च्या जोरावर सामान्य जनतेच्या समस्या ,शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारी माध्यमे असल्यानेच शासन प्रशासनात पारदर्शकता दिसुन येत आहे त्यात पत्रकरांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले ते प्रेस क्लब तालुका सावली च्या वतीने आयोजीत पत्रकार दिन ,सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
प्रेस क्लब तालुका सावली च्या वतीने. स्व.वामनराव गड्डमवार सांस्कृतिक सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे पत्रकार दिन आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचावर चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खास.अशोक नेते,भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,महामंत्री सतीश बोम्मावार,कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,कविंद्र. रोहनकर ,विनोद. धोटे.आदी उपस्थित होते.
लोकशाही प्रधान देशात शासनाच्या निर्माण झालेल्या जनकल्याणकारी योजना जरी कार्यान्वित झाल्या असल्या तरी त्यांचा लाभ मिळविण्यासाठी सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो या कामात नेहमी कामचुकारपना होत असल्याचे दिसते अशा.वेळेस वृत्तपत्रे,माध्यमेच विषयावर वाचा फोडुन न्याय देण्याची भूमिका बजावित असतात म्हणूनच माध्यमाना लोकशाहिचा चौथा स्तभ मानल्या जात आहे असे ही मत खासदार महोदयानी यावेळी व्यक्त केले
कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मार्लापण व दिप प्रज्जवलनाने करन्यात आली कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील उद्योजक कविंद्र रोहनकर ,आणि मुर्तीकार राजु उत्तुरवार.यांना शाल ,श्रीफळ देऊन खासदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर रुद्रापुर येथील प्रगतशील शेतकरी वामन बोरकुटे यांचा सुध्दा यावेळी सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमत दुधे , बाबा मेश्राम यांनी तर.आभार सुनील देहलकर. यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस.क्लब चे सुधाकर दुधे,संजय गेडाम ,विनोद बांगरे आदींनी सहकार्य केले…..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
04:26