*सावली तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न*

*विजयदुत नेमणे व मकरसंक्राती नियोजन संबंधित प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक*
*दिनांक:- १० जानेवारी २०२३*
*सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते,विकासपुरुष मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार सावली तालुका काँग्रेस कमिटीची सावली ब्रम्हपुरी क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेच्या सोयीसाठी बूथानुसार विजयदुत नेमणे व महिला भगिनींसाठी मकरसंक्राती नियोजन संबंधित प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जनसंपर्क कार्यालय सावली येथे माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटनुरवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.*
*यावेळी माजी तालुका अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती प.स.मा.विजय कोरेवार,माजी उपसभापती सौ.मंगला चिमड्यालवार,माजी उपसभापती मा.राजेंद्र भोयर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,माजी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मा.आशिष मंबतुलवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.खुशाल लोडे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,मा.दिवाकर काचीनवार,मा.विजय गड्डमवार,मा.अनिल गुरुनुले,मा.सचिन इंगुलवार,मा.चक्रधर दुधे,मा.सुनील पाल,सौ.ज्योति बहिरवार,सौ.कांताबाई बोरकुटे,सौ.शारदा कोहळे,सौ.वंदना गुरुनुले,मा.आकाश बुरीवार, नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.सचिन संगीडवार,मा.गुणवंत सुरमवार, नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार,माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार,मा.मोहन कुनघाडकर,मा.किशोर घोटेकार,मा.मिथुन बाबनवाडे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.*
*नागरिकांना शासकीय योजना माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून देखील वंचित राहतात. ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्येक गावात विजयभाऊ जनसेवाकेंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे.हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत तर मकरसंक्रांतीच्या पर्वावर जिल्हा परिषद क्षेत्रानुसार महिलांना मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून महिला भगिनींना भेटवस्तू देण्यात येणार आहे*