हिरापूर येथे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान

आज दिनांक 10जानेवारी 2024रोज बुधवारला ग्रामपंचायत हिरापूर येथिल संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान अंतर्गत विविध कामांची पाहणी महाराष्ट्रातील गावा-गावा मध्ये ग्रामस्वछते करिता शासन स्तरावर विविध स्पर्धा ठेवण्यात येतात त्यामध्ये “संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान “ही सुद्धा एक स्पर्धा आहे. गावातील स्वछता वाढावी, गाव निरोगी व्हावे तसेच गाव सुजलाम सुफलाम व्हावे असे अनेक उद्धेश आहेत.
पंचायत समिती सावली अंतर्गत हिरापूर हे गाव आहे. पंचायत समिती सावली येथिल गट विकास अधिकारी मा. वासनिक साहेब, विस्तार अधिकारी मा परसावार साहेब तसेच घरकुल विभागाचे अभियंता मा. लांडगे साहेब ग्रामपंचायत हिरापूर येथे पाहणी करिता आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना मालर्पण करून मानवंदना करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सौ. प्रिती गोहणे, उपसरपंच शरद कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व इतर उपस्थित होते.
यावेळेस विविध विकास कामांची चर्चा करण्यात आली व स्थळ भेटी देण्यात आल्या.