राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी विजय उरकूडे यांची निवड.

सावली: चंद्रपूर येथील दिनांक ०७/०१/२०२४ विश्राम गृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता संवाद सभा नुकतीच संपन्न झाली. राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड सुरू असून राज्यात विकासा सोबतच पक्ष संघटनाला गती प्राप्त झाली आहे. विदर्भात प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात संवाद सभा व पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष पदावर विजय उरकुडे यांची सर्वानुमते निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजेंद्र जैन जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी नुकतेच नवनियुक्त पदाधिकारी यांना पत्र दिले.
यावेळी सावली तालुका अध्यक्ष घनश्याम राऊत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आबीद अली, शरद जोगी, उप नगराध्यक्ष तथा राजुरा विधानसभा अध्यक्ष, महेंद्रसिंग चंदेल, नगरसेवक , गोंडपीपरी, सुजित उपरे, राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष, अर्चना बुटले, माजी शहर अध्यक्षा, बल्लारपूर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अतुल चहारे यांनी केले. प्रास्ताविक अजय ढुमणे यांनी तर आभार सुजित कावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रमोद कुमरे, स्वप्नील वाढई, अशोक ढुमने, करण चिल्का, दिनकर चटके, एकनाथ कौरशे, विशाल कौरशे, आष्ठीन सावरकर, प्रज्वल ढवस, संतोष मेश्राम, प्रमोद दुर्गे, गजानन चौधरी, अल्ताप भाई, जफर खान, राहुल वनकर, शिराज शेख, समीर वाटघरे , राकेश करडभुजे ,नाफे शेख यांनी अथक परिश्रम घेतले.