व्हॉईस ऑफ़ मिडिया तर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन

सावली : आद्य पत्रकार तथा दर्पणचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी 6 जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकारदिन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपुर जिल्हा व सावली तालुक्याच्या वतीने 9 जानेवारी रोजी जेष्ठ पत्रकारांचा सत्कार, तालुक्यातील उद्योजकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावली येथील स्व. वामनराव गड्डमवार सांस्कृतिक सभागृह, कृ.उ. बा.स.येथे सदर कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोले व सावली तालुकाध्यक्ष प्रविण झोडे यांनी दिली आहे.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हॉईस ऑफ़ मीडियाचे राज्य संघटक सुनिल कुहिकर भूषविणार आहेत. तर प्रमुख अतिथि म्हणून उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, सावली नगरपंचायत च्या नगराध्यक्षा लताताई लाकडे, तहसीलदार परीक्षित पाटिल, संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, ठानेदार आशिष बोरकर, पाथरीचे ठानेदार मंगेश मोहोड, व्हॉईस ऑफ़ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक, राज्य समन्वयक आनंद आंबेकर, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले, आदिंची उपस्थिती राहणार आहे. तर सत्कारमुर्ति जेष्ठ पत्रकर तेजराम कापगते, गोपाल रायपुरे, डॉ. षडाकांत कवठे, चंद्रपुर अर्बन सह. बँकचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, युवा उद्योजक कवीन्द्र रोहणकर, यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन रविंद्र डोर्लीकर हे करणार आहेत.
व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारिता व पत्रकार यांच्या हितासाठी झटणारी देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना आहे. सदर संघटनेच्या नियोजनानुसार व्हॉईस ऑफ मीडिया सावली तालुक्याच्या
वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पत्रकारितेत मोठे योगदान देणारे जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.