*अखिल भारतीय मादगी समाज* *संघटना तालुका शाखा पोंभुर्ना* *तर्फे* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*

पोंभूर्णा:- अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म. रा.) तालुका शाखा पोंभुर्णा तर्फे दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती संत रविदास नगर पोंभुर्णा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.मोहन देवतळे, प्रदेश सचिव रोशन येमुलवार, तालुका शहर प्रभारी भूषण इप्पलवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला..
महापुरुशांच्या प्रतिमेचे पूजन करून
कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.. समाजाच्या वतीने विद्येची देवता सावित्री माई फुले यांच्या जीवनावर आधारीत गीतांच्या माध्यमातून समाज बांधवांना कू. पायल देविदास इप्पलवार, व सौ. प्रीती रोशन येमुलवार यांनी मंत्रमुग्ध केले. तसेच कू. श्रेया देविदास इप्पलवार, व अनिकेत देविदास इप्पलवार यांनी आपल्या भाषण शैलीतून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याना उजाडा देत समाजातील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले…
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री अतुल वाकडे नगरसेवक, अध्यक्ष गणेश वासलवार, नगरसेवक, प्रमुख पाहुणे रामेश्वरी वासलवार नगरसेविका, मंगला बोलीवार माजी ग्रा.पं. सदस्स्या, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष श्री रोशन येमुलवार,संघटक पुरंदर इप्पलवार, सचिव नंदकिशोर इप्पलवार, कार्यवाहक दिनेश इप्पलवार, सुनीता गोरंतवार, अशोक बोलीवार,श्रीकांत शेंडे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते…
कार्यक्रम प्रसंगी डॉ.अभिलाषा गावतुरे सामाजिक कार्यकर्त्या यांचेकडून विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते नोटबुकचे वितरन करण्यात आले..
स्वरा चीलमुलवार, काव्या गोरंतवार यांनी नृत्य सादर करून, उपस्थितांचे मनोरंजन केले….
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनाक्षी देविदास इप्पलवार, व आभार अनिकेत गोरंतवार यांनी मानले…यावेळी समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…