*ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

पोंभुर्णा: अखिल.भारतीय मादगी समाज संघठना ( म.रा.) शाखा पोंभुर्णा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जंयती मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला..यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..संघठनेचे संस्थापक-अध्यक्ष मा.मोहनभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनानूसार या संघठनेचे प्रदेश सचिव रोशन येमुलवार, ता.शहर प्रभारी भुषण ईप्पलवार यांच्या पुढाकाराने यशस्वी करण्यात आला. सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक मा. अतुल वाकडे नगरसेवक, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश वासलवार नगरसेवक, प्रमुख पाहुणे रामेश्वरी वासलवार नगरसेविका, श्रीकांत शेंडे सा.कार्यकर्ता, प्रशांत गोंगले, पुरंदर इप्पलवार, मंगला बोलीवार मा.ग्रा.प.सदस्या, प्रफुल्ल गोरंतवार, दिनेश इप्पलवार, रमेश गोरंतवार, संदीप जिल्लेवार, नंदू इप्पलवार,प्रमोद गोरंतवार, प्रदीप बोलीवार व समाज बांधव व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाप्रसंगी श्रेया इप्पलवार, प्रिती येमूलवार यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मीनाक्षी देविदास इप्पलवार यानी केले तर आभार प्रदर्शन अनिकेत गोरंतवार यानी केले..